Panjabrao Dakh Live शेतकऱ्यांनी तातडीने शेतीची कामे पूर्ण करावी
प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यात 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात आपली शेतीची कामे उरकून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोयाबीनची वळणी करून ती झाकून ठेवावी आणि सोयाबीन सोंगणी, काढायची तयारी असेल तर त्या काढून घ्याव्यात.
8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता
8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत शेतीच्या कामांना अडथळा येऊ शकतो. शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन आपली तयारी करून ठेवावी. राज्यात येणाऱ्या या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन करण्यासाठी पंजाबराव डख यांनी सूचित केले आहे.