Tur crop wilting तुरीच्या झाडाच्या सुकण्यामागील चार प्रमुख कारणे: उपाययोजना व संरक्षण

Tur crop wilting तुरीच्या झाडांच्या सुकण्याची समस्या अनेकांना भेडसावत आहे. या समस्येमागे चार प्रमुख कारणे आहेत: मररोग, फायटोपथोरा, मुळकुज, आणि हुमणी अळी. या चार कारणांमुळे झाडं सुकत असतील, तर त्यावर कसे उपाय करायचे याबाबत सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.

फायटोपथोरा (खोडकुज) रोगाचे लक्षणे आणि उपचार

जर तुरीच्या झाडाच्या खोडावर डोळ्यासारखा सट्टा, गाठ किंवा खोलगट भाग दिसत असेल, तर त्या ठिकाणी फायटोपथोरा रोगाचा प्रादुर्भाव आहे. हा रोग फायटोपथोरा ड्रेसलेरी नावाच्या बुरशीमुळे होतो आणि सततच्या रिमझिम पावसात अधिक दिसून येतो. यासाठी शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाचा (Trichoderma fungicide) वापर करावा आणि मेटालेक्झिल आणि मॅनकोजेप असलेले रासायनिक बुरशीनाशक (उदा. रिडोमिल गोल्ड) 30 g प्रति 15 l च्या पंपासाठी वापरून खोडावर धार मारावी. प्रत्येक झाडाला 100 ते 200 ml द्रावण टाकणे गरजेचे आहे.

हुमणी अळी आणि मुळकुज रोगाचे नियंत्रण

झाडं उपटताना जर सहज उपटत असतील, तर हुमणी अळी किंवा मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव आहे. हुमणी अळी नियंत्रणासाठी मेटरायझियम बुरशीनाशक वापरून ड्रेंचिंग करावी. जर खोडाची साल काढल्यानंतर काळ्या रंगाची बुरशी दिसत असेल, तर मुळकुज रोग आहे.

हे पण वाचा:
hawamaan andaaz राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता, काही भागांत गडगडाटी पाऊस hawamaan andaaz

मररोगाचे नियंत्रण

जर झाड उपटताना जोर लागत असेल आणि मधून काळ्या रंगाचे ठसे दिसत असतील, तर मररोगाचा प्रादुर्भाव आहे. यासाठी पाण्याचा निचरा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतामध्ये ट्रायकोडर्मा चा एकरी चार किलो वापर करावा आणि मररोगाच्या लक्षणे असलेल्या झाडांवर कॉपर ऑक्सीक्लोराइड (उदा. ब्लू कॉपर) (Blue Copper) चे 30 g प्रति 15 l पाण्यासह ड्रेंचिंग करावे.

योग्य नियोजनाने मररोगावर नियंत्रण

मररोगाच्या क्षेत्रात पुढील 20 झाडे आणि मागील 20 झाडांना, बाजूच्या ओळींमध्ये रासायनिक बुरशीनाशकाची ड्रेंचिंग करणे आवश्यक आहे, ज्यामुळे कमी खर्चात मररोगाला नियंत्रण करता येईल. शेतकऱ्यांनी हे नियोजन करून आपल्या पिकांचे संरक्षण करावे. इतर ठिकाणी आपण ट्रायकोडर्मा मित्र बुरशी वापरून आपण खर्चही कमी करू शकतो आणि आपल्या जमिनीची आरोग्याची चांगली व्यवस्थादेखील करू शकतो.

हे पण वाचा:
Karjmukti Yojna निवडणुकीपूर्वीची महत्वाची कॅबिनेट बैठक; उद्या होणार शेवटचा निर्णयांचा सपाटा Shetkari Karjmukti Yojna

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा