Krishi solar pump Yojana 2024 महाराष्ट्रातील जे शेतकरी सौर पंप योजनेतून वंचित राहिले होते, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात येणार आहेत.
नवीन पोर्टलची सुरुवात
या योजनेसाठी नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्याद्वारे शेतकरी अर्ज करू शकतात. हे पोर्टल लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेत सुरू होईल आणि या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी अर्ज करता येईल.
कोण अर्ज करू शकतात?
या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी सौर पंपाचा लाभ मिळालेला नाही, ते शेतकरी या नवीन पोर्टलवर अर्ज करू शकतील. या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक ऊर्जा स्रोत उपलब्ध होणार आहे.
सौर कृषी पंप योजनेबद्दल अधिक माहिती आणि अर्जाची प्रक्रिया या पोर्टलवर दिली जाणार असून, शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ पोर्टलचे उद्घाटन
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 13 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई येथे महावितरणच्या ‘मागील त्याला सौर कृषी पंप योजना’ पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. या योजनेसाठी नोंदणीसाठी नवीन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे, ज्याचा लाभ वंचित शेतकऱ्यांना मिळणार आहे.
योजना आणि पात्रता निकष
ही योजना शेतकऱ्यांना सिंचनासाठी शाश्वत आणि स्वतंत्र वीजपुरवठा देण्यासाठी राबवली जात आहे. सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना 10% रक्कम भरून सौर पॅनेल्स आणि कृषी पंप दिले जाणार आहेत, तर अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांसाठी हा हिस्सा फक्त 5% असेल. बाकीचा खर्च केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदानाच्या रूपात दिला जाईल.
जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते साडेसात अश्वशक्ती (एचपी) चे पंप दिले जातील. अडीच एकरपर्यंतच्या शेतजमिनीधारक शेतकऱ्यांना 3 एचपी, 2.5 ते 5 एकरपर्यंत 5 एचपी आणि 5 एकरपेक्षा जास्त शेतजमिनीधारक शेतकऱ्यांना 7.5 एचपी चा सौर पंप दिला जाईल.
अर्ज कसा करायचा?
शेततळे, विहीर, बोरवेल किंवा बारमाही नदी किंवा नाल्याच्या शेजारील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच, जलसंधारण प्रकल्पाच्या पाणीसाठ्यातून पंप उपसणे शक्य नाही. अटल कृषी पंप योजना 1, अटल कृषी पंप योजना 2 आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांना यामध्ये अर्ज करता येईल.
13 सप्टेंबर 2024 पासून हे पोर्टल सर्व शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात येणार आहे, आणि शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
☀️ Inauguration of ‘Magel Tyala Saur Krushi Pump’ scheme’s registration web portal, unveiling of poster and release of information booklet
☀️ ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेसाठी नोंदणी वेबपोर्टलचे उदघाटन, पोस्टरचे अनावरण आणि माहिती पुस्तिकेचे प्रकाशन🕛 11.45am |… pic.twitter.com/9bPl3V20W9
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 13, 2024