soybean Kapas anudan राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठी घोषणा केली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपयांचे अनुदान देण्यासाठी राबवली जाणारी कापूस आणि सोयाबीन भावांतर योजना आता पूर्ण निधीसह शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे.
4194 कोटींच्या निधीला मंजुरी
पावसाळी अधिवेशनात राज्य शासनाने या योजनेसाठी 4194 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, वितरित करताना 60% निधीच वितरित केला जाईल, अशी चर्चा झाली होती. 29 जुलै 2024 रोजी या निधीपैकी 2516 कोटी 80 लाख रुपये वितरित करण्यात आले होते. या अपूर्ण वितरणामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.
उर्वरित निधीसह संपूर्ण वितरणास मंजुरी
आता या अफवांना पूर्ण विराम देत, राज्य शासनाने उर्वरित 1593 कोटी 99 लाख रुपये वितरित करण्यास आजच्या जीआरच्या माध्यमातून मंजुरी दिली आहे. त्यामुळे, या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेले 4194 कोटी 68 लाख रुपये पूर्णपणे वितरित करण्यात आले आहेत.
16 सप्टेंबरपासून अनुदान वितरण प्रक्रिया सुरू
शेतकऱ्यांच्या याद्या पूर्वीच प्रकाशित झाल्या असून, काही शेतकऱ्यांची नावे वगळली गेली होती. त्यांचा समावेश करण्यासाठीही जीआर निर्गमित करण्यात आला आहे. या अनुदानाचे वितरण 16 सप्टेंबर 2024 पासून शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून सुरू होईल. यासंदर्भातील अधिकृत अपडेट लवकरच मिळणार आहे.
शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे.