weather forecast today आज 13 सप्टेंबर सायंकाळी 6:15 वाजल्यापासून राज्यातील हवामानाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काल सकाळी 8:30 ते आज सकाळी 8:30 या दरम्यान विदर्भात क्वचित ठिकाणी हलकासा पाऊस झाला, तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलके थेंब पडले. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आणि कोकण-घाट परिसरात हलक्या सरी पाहायला मिळाल्या.
डिप्रेशनची तीव्रता कमी, राज्यावर विशेष परिणाम नाही
उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात असलेले डिप्रेशन येत्या 24 तासांत कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होणार आहे, त्यामुळे याचा राज्यावर विशेष परिणाम होणार नाही. याशिवाय, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा अंश पश्चिम बंगाल, झारखंड आणि छत्तीसगड मार्गे मध्य प्रदेशाकडे जात आहे, परंतु या सिस्टमचा राज्यावर विशेष प्रभाव पडणार नाही.
राज्यात हलक्या सरींची शक्यता
सध्याच्या सॅटेलाईट इमेजनुसार, जळगावच्या पश्चिमेकडील काही तालुक्यांमध्ये, तसेच गोंदिया, नागपूर, आणि वर्ध्याच्या काही भागांमध्ये क्वचित ठिकाणी हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असूनही विशेष पावसाची शक्यता नाही. आज रात्रीही पश्चिमेकडून ढग पूर्वेकडे जातील, मात्र त्यात जास्त पाऊस अपेक्षित नाही.
उद्याच्या हवामानाचा अंदाज
उद्या 14 सप्टेंबर रोजी, कोकण आणि घाट परिसरात हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. परंतु, राज्याच्या इतर भागांत विशेष पावसाची शक्यता नाही. क्वचित ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन हलका पाऊस होऊ शकतो, परंतु राज्यभरात मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता कमी आहे.
राज्यात उद्या हवामानाचा अंदाज: काही जिल्ह्यांमध्ये कोरडे वातावरण, इतर भागांत हलका पाऊस
उद्या जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात कोरडे वातावरण
हवामान विभागाने 13 सप्टेंबरच्या सायंकाळच्या अपडेटमध्ये उद्या म्हणजे 14 सप्टेंबर रोजी जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाची अपेक्षा नाही.
इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सध्याच्या अंदाजानुसार इतर भागांत स्थानिक पातळीवर हलक्या सरींची अपेक्षा वर्तवली आहे.
सद्याच्या हवामान स्थितीच्या आधारे, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, आणि लातूर जिल्ह्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नसून, राज्यातील इतर भागांमध्ये हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/L5cm5NXIfy
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 13, 2024